Notice

Please return library books

Library Activity

 

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती - वाचन प्रेरणा दिन 
वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर 2024

वाचन प्रेरणा दिन अहवाल (Reading Motivational Day Report)

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे पत्र संदर्भ क्र. SU/BBKKRC/739 दि. 09/10/2024 नुसार दिलेल्या नियमावली नुसार ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि वाचन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती  15 ऑक्टोबर 2024  ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून सकाळी 10.30 ते 11.00 या वेळेत विद्यापीठाच्या आदेशानुसार बी. ए. भाग 1 च्या वर्गात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकप्रशासकीय सेवक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 10.30 वाजता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आपल्या जीवनात वाचनाचे किती महत्व आहे याविषयी मा. प्राचार्यांनी सर्वांना मागर्दर्शन केले. सकाळी 10.45 ते 11.00 या वेळेत LCD Projector वर सर्वांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन असणाऱ्या मजकूराचे’ सामुहिक वाचन केले. यांनतर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजाराम कांबळे यांनी ‘भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. विजय यादव यांनी केले तर आभार राष्ट्रीय छात्र सेना (NCC) प्रमुख   डॉ. गणेश गभाले यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शैला चोबे यांनी केले. या कार्यक्रमाची सर्व तयारी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रमुख डॉ. सुनिल पवार यांनी केली. यावेळी प्रा. अभय जायभये, डॉ. अजितकुमार जाधव प्रा. संतोष निलाखे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कॅप्टन डॉमहेश गायकवाड

                                                                                                                















   


                          प्राचार्य  श्री अभयकुमारजी  साळुंखे  जन्मदिन - ज्ञान शिदोरी दिन    (17/01/2025 )

आर्टस्कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजनागठाणेता. जि. सातारा येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस ‘ज्ञानशिदोरी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचा ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम, ‘श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह’, ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ महाविद्यालयाचे ‘रौप्य महोत्सवी वर्ष’ व ‘ज्ञानशिदोरी दिन’ या निमित्त ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ भेट / ग्रंथ दान ग्रंथ वाचन आणि श्री स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि  विचार याविषयाचे  चित्र प्रदर्शन अश्या उपक्रमांचे आयोजन ग्रंथालयात ग्रंथालय विभाग, मराठी विभाग, वाङ्मय मंडळ आणि वाचन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले  होते. प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आणि प्रमुख पाहुणे मा. श्री. अजित साळुंखे, संचालक, अजिंक्यतारा सहकारी सुतगिरणीशेंद्रे यांच्या हस्ते सरस्वती, श्री स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुरूदेव कार्यकर्त्याकडून भेट स्वरूपात जमा झालेले १९ ग्रंथ महाविद्यालयातील गरीब, हुशार, होतकरू व वाचनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानशिदोरी’ म्हणून देण्यात आले. यावेळी सामुहिक वाचन करण्यात आले. श्री. अजित साळुंखे यांनी ‘श्री स्वामी विवेकानंद यांचे युवकांना प्रेरणादायी विचार’ या विषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपामध्ये ‘एकदा ग्रंथ लिहित असताना वाचन किती महत्वाचे आहे’ याविषयी प्र. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले आणि त्याचबरोबर बापूजींचा वारसा सक्षमपणे चालविणारे मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. प्रमुख उपस्थितीमध्ये एस. जी. के. महाविद्यालयलोणी काळभोर मराठी विभाग प्रमुख मा. प्रा. बाळासाहेब जगताप व जय हिंद अकॅडमीचे श्री. सचिन जाधव होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. विजय यादव यांनी केले तर आभार जिमखाना प्रमुख डॉ. लक्ष्मण दोडमणी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्मिता कालभूषण यांनी केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष निलाखे, डॉ. अजितकुमार जाधव, डॉ. सुरेश पाटील, डॉ. गणेश गभाले, डॉ. सुनिल पवार, प्रा. शौकत आतार,  श्री. विजय दळवी, श्री. प्रशांत सावंत, श्री. डी. जी. आंबेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


                                                                            कॅप्टन डॉमहेश गायकवाड























                                 





No comments:

Post a Comment

N - List e- Books & e - Journal